जळगाव। कोपर्डी प्रकरणी सरकारतर्फे 6 महिन्यात फास्ट ट्रक कोर्टाद्वारे न्याय देण्याची घोषणा केवळ पोकळ ठरली आहे. त्यामुळे जलद न्यायाच्या मागणीसाठी तसेच मनात असलेली खदखद व रोष व्यक्त करुन सरकारद्वारे होणारी वेळकाढूपणाच्या वृत्तीला लगाम लावण्यासाठी अवघ्या समाज 13 जुलैला एकत्र मराठा क्रांती मोर्चोतर्फे एकत्रीतपणे ‘एक दिवा लेकीसाठी’ हा संदेश घेऊन मुकमोर्चाद्वारे शहरातील प्रमुख चौकामध्ये सर्व परिवार, मित्र व या अशा घटनेची चिड असणार्या प्रत्येक गावकर्यांसोबत एकत्र येऊन एक दिवा प्रज्वलित करुन श्रध्दांजली वाहण्यात येईल.
मोर्चाकडून अपेक्षा
शहरातील काव्यरत्नावली चौक येथे दि. 13 रोजी सायं. 6 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून घटनेच्या निषेधार्थ आपल्या उजव्या हाताच्या दंडाला काळी रिबीन लावून दैनंदिन व्यवहार करावे, यात गृहिणी, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, डॉक्टर, वकिल, अधिकारी, व्यावसायिक व कामगारांनीसुध्दा सहभाग घ्यावा, ‘एक शहर एक दिवा’ या उपक्रमास रवि देशमुख यांनी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली.
यांची होती उपस्थिती
श्री. बच्छाव, बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ. राजेश पाटील, संगीता पाटील, लिना पवार, चंद्रकांत कापसे, श्रीराम पाटील, अॅड. विजय पाटील, किरण साळुंखे, विकास पवार, संजय पवार, विकास नरवाडे, भिमराव मराठे, संदीप भोईटे, प्रमोद पाटील, अॅड. सचिन चव्हाण, श्रध्दा पाटील, दिनेश कदम, प्रा. सुनिल गरुड, गोपाळ तरळकर, विनोद देशमुख आदी.