जळगाव : जळगावातील केळी पिकाला योग्य मोबदला देण्यासह रस्ते, रेल्वेचे जाळे विणले जाऊन जळगावात औद्योगिक क्षेत्रात भरभराट आणून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज रविवारी जळगावात सभा सुरु आहे. त्यावेळी मोदी बोलत होते.
यावेळी मोदींनी महाराष्ट्राचा राहिलेला विकास करण्यासाठी पुन्हा भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले.