जळगावात कंटेनर रीव्हर्स घेताना विद्युत डीपीवर आदळला : चालक जागीच ठार

जळगाव :विद्युत डीपीवर रीव्हर्स आलेले कंटेनर धडकल्यानंतर घडलेल्या दुर्घटनेनंतर विजेचा धक्का लागून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना खेडी पेट्रोल पंपाजवळ घडली. जगदीशसिंह बोरा (38, रा.उत्तराखंड) असे मयत कंटेनर चालकाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली.

विद्युत शॉक लागल्याने जागीच मृत्यू
शहरातील खेडी परीसरातील पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला कंटेनर (आर.जे.09 जी.सी.2597) या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालक जगदीशसिंह बोरा (38, रा.उत्तराखंड) यांनी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता कंटेनर मागे घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज न आल्याने कंटेनर सरळ डीपीवर आदळला. काही तरी आवाज झाला म्हणून जगदीशसिंह खाली उतरले आणि त्यांनी पाहणी करून घाईघाईत पुन्हा कंटेनरमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक डीपीवर मोठा जाळ होऊन शॉर्टसर्किट झाला.

शॉक लागल्याने जागीच मृत्यू
जगदीशसिंग यांना जोरात विजेचा झटका बसल्याने ते खाली कोसळले. विजेचा तीव्र धक्का लागून जगदीशसिंह यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परीसरातील लोकांनी घाव घेऊन सावधगिरीने त्यांचा मृतदेह एका बाजूला केला. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून मयत चालकाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला असून एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.