जळगावात कारण नसताना तिघांनी भाजीपाला विक्रेत्यास केली मारहाण

In Jalgaon, three people beat up a vegetable seller for no reason जळगाव : कारण नसतांना भाजीविक्री करणार्‍या तरूणाला तीन जणांनी बेदम मारहाण केली शिवाय मांडीवर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बुधवार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींचा पोलिसांकडून शोध
चंद्रकांत साहेबराव महाजन (38, मारूती मंदीराजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला असून भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवाीर, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता रामानंद नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ चंद्रकांत महाजन हा काही कामानिमित्त आला असता तिथे निरंजन, केशव आणि निरंजनचा भाऊ (तिघांचे पुर्ण नाव माहित नाही) हे तिघे आले. त्यांनी काहीही कारण नसतांना चंद्रकांत महाजन याला बेदम मारहाण केली.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा
या मारहाणीत चंद्रकांतला भाजी कापण्याच्या चाकूनने मांडीवर वार करून जखमी केले. या प्रकरणी चंद्रकांत महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.