अन्न-औषध प्रशासनाच्या भूमिकेविषयी साशंकता : धडक कारवाईची मागणी
फैजपूर- गत आठवड्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हाकाकोडा येथे लाखोंचा रुपयांचा गुटखा जळगावच्या अन्न व औषध विभागाने पकडला होता तर जळगाव येथेदेखील दोन दिवसांपूर्वी दहा लाखांचा गुटखा जप्त करून व्यापार्यावर कारवाई झाली मात्र फैजपूरातील गुटखा विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. शहरात गुटखा विक्रीचा मोठा व्यापार सुरू असल्याचे चित्र आहे मात्र अन्न व औषध प्रशासनाची अधिकारी शहरात येऊन चिरी-मिरी करून जात असल्याचा उघड आरोप शहरवासी करीत आहेत. या बाबीमुळे मात्र गुटखा व्यापार्यांचे फावले आहे. शहरातील बडा व्यापारी हा पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासन यांना हाताशी धरून जळगांव येथून गाडीत रात्री मोठ्या प्रमाणावर फैजपूर शहरात गुटखा आणत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे फैजपूरातील व्यापारी गुटख्याचा साठा वाहनातच करीत असतानाही यंत्रणा मात्र कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.