जळगाव : ऊस रसवंतीची गाडी बाजूला करण्याचे सांगितले असता त्याचा राग आल्याने तरुणावर पट्टीने वार करण्यात आला. ही घटना कमल पॅराडाईज या हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी विक्रेत्या विरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील जुना खेडी रोड परीसरातील विठोबा नगर येथे विलास मुरलीधर कोळी (40) हे राहतात. त्यांचा रसवंतीचा व्यवसाय असून तेे हॉटेल कमल पॅराडाईज परीसरात गाडी लावून त्यावर उदरनिर्वाह करतात तर याच भागात जैनाबाद येथील भरत विलास कोळी हा सुद्धा रसवंतीची गाडी लावतो. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विलास कोळी याने भरत कोळी याला त्याची गाडी बाजूला करण्यास सांगितले व त्याचा राग आल्याने भरत कोळी याने विलास कोळी यांच्यावर पट्टीने वार करत दुखापत केली. याप्रकरणी विलास कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भरत विलास कोळी याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक मनोज येऊलकर करीत आहेत.