जळगाव । टाइमपास फेम अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिला बहिणाबाई महोत्सवात शनिवारी चाहत्यांचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तिच्या वडिलांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना पत्र लिहून या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगावमध्ये बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते शनिवारी या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. बहिणाबाई महोत्सवाच्या उदघाटनासाठी गायिका केतकी माटेगावकर हिला बोलविण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन दीपक परदेशी यांनी केले होते. कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला.
कडक कारवाई करण्यात यावी
बहिणाबाई महोत्सवात आयोजकांकडून सुरक्षितेबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. अशा आयोजकांच्या हलगर्जीपणामुळे केतकीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे आयोजक दीपक परदेशी यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी. केतकी हिला वेळ पडल्यास पोलीस संरक्षण देण्यात यावे.
– डॉ. नीलम गोर्हे, आमदार, शिवसेना.
आयोजकांनी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. पोलिस, बाऊन्सर्स किंवा साधा गार्डही तेथे नव्हता. कुठल्याही महिला कलाकाराकरीता हे खूप त्रासदायक आहे. सुदैवाने एक वडील म्हणून मी तिथे होतो. म्हणून हवी ती काळजी घेऊ शकलो. यापुढे ही काळजी महिला कलाकारांना आमंत्रित केल्यावर घेण्यात यावी ही अपेक्षा आहे
-पराग माटेगावकर, वडील.