जळगावात खतांचे दुकान पेटले : लाखोंचे आर्थिक नुकसान

जळगाव : शहरातील बी.जे. मार्केट मधील खताच्या दुकानाला बुधवारी सकाळी आग लागल्याने दुकानदाराला लाखोंचा आर्थिक फटका बसला. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

पहाटेच्या सुमारास लागली आग
जळगाव शहरातील बी.जे.मार्केटमधील श्री राम समर्थ अ‍ॅग्रो या खतांच्या दुकानाला बुधवारी 16 मार्च रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही नागरीकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशामन विभागाला माहिती दिली. दरम्यान, अग्निशमन विभागाचा बंब अवघ्या काही मिनिटाच घटनास्थळी दाखल झाला. या बंबाने पाण्याचा मारा केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत दुकानाच्या वरच्या मजल्यावर ठेवलेले खते व बी-बियाणे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.