राष्ट्रवादीचे महानगर सचिव अॅड. कुणाल पवार यांचा तक्रारीनुसार पाठपुरावा
जळगाव – शहरातील रामानंद नगर परीसरात दोन रेशन दुकानांवर गेल्या दोन महिन्यांपासून धान्य मिळत नाहीय, विशेष म्हणजे यादीत नाव असतांना कमी धान्य मिळतेय, तसेच यादीत नाव येण्यासाठी रेशनकार्डधारकांकडून पैसे घेवून तीन महिन्यांपासून ताटकळत ठेवले जात आहे, अशा तक्रारी होत्या. त्याची दखल घेत अॅड. कुणाल पवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर सकाळी 10 वाजेच्या सुमारास जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी अचानकपणे धाड टाकून चौकशी केली. या दरम्यान अनेक रेशन दुकानांवर घोळ दिसुन आला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव अॅड. कुणाल पवार हे स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी सोबत घेऊन शहरातील रामानंद नगर, वाघ नगर , हरीविठ्ठल नगर मधील दुकान न 37/2 37/4 गाठले. याठिकाणी स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेऊन रेशन वाटप केले. यानंतर ज्याची नावे यादीत नाहीत त्यांना नावे वाढवून देण्यास सांगितले.
मद्यधुंद अवस्थेत रेशन वाटप दुकान परवाना निलंबीत चे आदेश
दुकान न 37,/4 याठिकाणी पाहणी गेले असता तो दारू पिऊन रेशन वाटत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पुरवठा अधिकार्यांनी कारवाईची तंबी दिली. तर दुसरीकडे दुकानदार पैसे मागत आल्याचे लक्षात आल्याने लवकरच त्यांचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.