जळगावात घरगुती गॅसचा काळाबाजार : दोघांविरोधात गुन्हा

Domestic gas black market in Jalgaon: Crime against two जळगाव : घरगुती गॅस सिलिंडर वाहनात रीफिलिंग केले जात असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाला मिळाल्याने बुधवारी दुपारी दोन वाजता छापा टाकून 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गॅस रीफिलिंग पुन्हा ऐरणीवर
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परीसरातील जळगाव-भुसावळ रस्त्यावर असलेल्या अजिंठा चौकाजवळ असलेल्या बसथांबाजवळ जवळ दोन जण अवैधरीत्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचार्‍यांना कारवाईच्या सुचना करण्यात आल्या. पोलिस उपनिरीक्षक अनिश शेख, हवालदार विजय सोनवणे, पोलिस नाईक इमरान शेख, पोलिस नाईक मुजफ्फर काझी, गोविंदा पाटील यांनी बुधवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता छापा टाकून कारवाई केली. संशयीत आरोपी जावेद खान सलीम खान (42) व मोहसीन उर्फ दत्ता शेख हमीद (28, दोन्ही रा.मास्टर कॉलनी) यांना अटक करण्यात आली.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
संशयीकडून भारत गॅसचे सात सिलेंडर, तीन हजार 460 रुपयांची रोकड आणि गॅस भरण्याचे साहित्य व मोटार असा एकूण 26 हजार 760 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी जावेद खान सलीम खान व मोसीन उर्फ दत्ता शेख हमीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.