Jalgaon city rocked by murder again: Youth dies after being stabbed by a chopper जळगाव : जळगावातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून युवकाचा वादातून खून करण्यात आल्याची घटना रविवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता शिवकॉलनी परीसरात घडली. अक्षय अजय चव्हाण (23, रा.पिंप्राळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
चॉपर मारल्याने तरुणाचा मृत्यू
समजलेल्या माहितीनुसार, काही तरुणांमध्ये रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोबाईलवरून जुनाच वाद सुरू होता तर हा वाद वाढत गेल्याने अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार याच्या भावाच्या डोक्यात दगड मारल्याने त्याच्या रागातून बाळू पवार याने चॉपरच्या सहाय्याने अक्षय चव्हाण या तरुणावर हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय चव्हाण यास .जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात पोलीस दाखल झाले असून संशयीताची धरपकड सुरू करण्यात आली आहे.