जळगाव : शहरातील जोशी पेठ येथून तरुणाच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
मोहम्मद इस्त्राईल मोहम्मद मुस्ताक तांबोळी (33, रा.बागवान मोहल्ला, जोशी पेठ) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मेडिकल दुकान चालूवन आपल्या कुटूंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 सी.पी.6395) असून सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे दिवसभर काम करून सायंकाळी 11.30 वाजता घरी आले व त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर लावली मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शुक्रवार 18 फेब्रुवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे करीत आहे.