जळगाव : शहरातील खंडेराव नगरात जुने भांडण उकरून काढत तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या वादातून मारहाण
हर्षल गोपाल बारी (23) हा तरुण खंडेराव नगरातील राहतो. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता त्याला मागील भांडणाच्या कारणावरुन योगेश हरीलाल सोनार व निलेश हरिलाल सोनार या दोघा भावंडांनी चापटासह बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या हर्षलचा मित्र राहूल लक्ष्मण सुतार यालाही दोघा भावंडांनी मारहाण केली. या मारहाणीत हर्षलच्या डोक्यास दुखापत झाली असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी हर्षच्या तक्रारीवरुन योगेश सोनार व निलेश सोनार या दोघा भावंडांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कालसिंग बारेला हे करीत आहेत.