जळगावात जून्या वादातून दोघा तरुणांवर चॉपर हल्ला

Chopper attack on two youths in Jalgaon due to old dispute जळगाव :लग्नात नाचण्याच्या जुन्या वादातून दोघा तरुणांवर चॉपर मारून हल्ला करण्यात आला. ही घटना रामेश्वर कॉलनीत रविवार, 4 डिसेंबर रोजी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात नितीन निंबा राठोड (24) व सचिन कैलास चव्हाण (22) हे जखमी झाले असून नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

लग्नात नाचण्याच्या वादातून हल्ला
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत नितीन राठोड व सचिन चव्हाण हे वास्तव्यास आहे. लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मेहरुण परिसरातील तुषार सोनवणे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्या वादाचे अनेकदा पडसाद उमटले असून वादाच्या कारणावरुन रविवार, 4 डिसेंबर रोजी 8.15 वाजेच्या सुमारास सुमारास नितीन हा घराबाहेर उभा असतांना संशयीत आरोपी कारमधून आले व त्यांनी नितीनला जवळ बोलावून घेत त्याच्यावर चॉपरने केले. नितीनवर वार होत असल्याचे समजताच त्याचा आतेभाऊ सचिन हा त्याठिकाणी आला असता हल्लेखोरांनी त्याच्यावरदेखील वार करुन जखमी करीत पळ काढला. जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.