जळगाव- जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या जनरल फिजिशियन डॉ.नरेंद्र दोशी यांच्या पत्नी भारती (72) यांचे हातपाय बांधून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांच्या रोकडसह पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी दिड वाजता गांधी नगरात घडली. या घटनेनंतर आरोपींच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.