*खडके चाळ नजिक तरुणाचा खून ; तीन दिवसांतील खुनाची दुसरी घटना*
जळगाव ;- शहरातील इंद्रप्रस्थनगर खळके चाळ चौकच्या दरम्यान भूषण भरत सोनवणे वय २५ याच्यावर कुणीतरी अज्ञाताने वार करून त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. भूषण यास तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी खुनाची घटना आहे.