जळगाव- भुसावळ रोडवरील दुरदर्शन टॉवरजळली जगदंब्बा मोटार रिपेअरिंग वर्कशॉपमध्ये विद्युत तार पडून तीन लक्झरींचा जळून कोळसा झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या दुकानावरील कामगार जेवणाला बसले असताना अचाकन विद्युत तार तुटून एका लक्झरीवर पडली, क्षणात लक्झरीने पेट घेतला, या आगीत बाजूला उभ्या असलेल्या दोन लक्झरीही सापडल्याने त्याही जळाल्या. पालिकेचे दोन व जैन इरिगशनचे एक असे तीन बंबानी आग विझविली.