जळगावात दानवेंचा निषेध

0

जळगाव । शहरातील राष्ट्रवादी कार्यालया बाहेर राष्ट्रवादीच्या युवक संघटनेच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या व्यक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून चपला मारो आंदोलन करण्यात आले. पुनाकृती पुतळ्याला चपलाचा हार देखील घालण्यात आला. राष्ट्रीय कॉग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देऊन निषेध नोद्विण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले दानवे यांना जळगाव जिल्ह्यात आल्यास काळे फासण्यात येणार असल्याचा ईशारा दिला आहे. तर कॉग्रेसने शेतकर्‍यान कॉग्रेस हि पदवी देण्यापेक्षा ती आपल्याच कडे ठेवावी आणि राज्यातील असलेल्या शेतकर्‍याच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी टीका जिल्हा कॉग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्ह्यासह राज्यभरातून टीकेचे रान उठले आहे.

शेतकर्‍यांना रडकुंडीस आणले
भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा वक्तव्याचा निषेध म्हणून जिल्ह्यात येतील तेव्हा तोंडाला काळे फासणार येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यानी निवेदन म्हंटले आहे पोकळ आश्‍वासने, नुसतीच भाषणे करून जनतेची दिशाभूल करणार्या भाजपा सरकारने शेतकर्यांना रडकुंडीस आणले असून शेतमालाला भाव नाही. तुरीची खरेदी होत नसतांना कर्ज माफीच्या मुद्यावर आत्मह्या होणार नाही. याची हमी द्या असे म्हणणार्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍याना तूर खरेदी दिली तरीसुद्धा रडतात साले असे वक्तव्य करून शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याची ठिका राष्ट्रवादीने केली आहे. या वक्त्वव्यामुळे भारतातील व राज्यातील तमाम शेतकर्यांचा अपमान झाला असून भाजपाचे बेगडी शेतकरी प्रेम यातुन दिसून आले आहे. आम्ही जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खा. दानवे यांच्या या व्यक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. व खा. दानवे जेव्हा जळगाव जिल्हा दौर्यावर येतील त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासू असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, संदीप पवार, रोहन सोनवणे, ललित बागुल, सोपान दामु पाटील, किशोर पाटील, सागर कुमावत आदी उपस्थित होते.

कॉग्रेस कमिटीकडून दानवेंचा निषेध
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी जालना येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यातील शेतकर्यांसाठी ’साले’ या शब्दाचा वापर केला. ज्या अर्थी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासारखे जबाबदार नेते शेतकर्यांसाठी ’साले’ या शब्दाचा वापर करतात, हा शब्द एक बहुमान असावा, अशी आमची धारणा असल्याचे मत जळगाव जिल्हा कॉग्रेसने निवेदनातून व्यक्त केले आहे. दानवे यांनी जगाच्या पोशिंदासाठी या शब्दाचा कदापीही वापर झाला नसता. परंतु राज्यातील शेतकर्यांना अशा विशेषणांनी सन्मानाची नव्हे तर कर्ज माफी, उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देणारा हमीभाव आणि शेतमालाच्या शासकीय खरेदीची निवांत आवश्यकता आहे.

कॉग्रेसच्या नेत्यांचा आंदोलनात सहभाग
खा.डॉ. उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी, अ‍ॅड. ललिता पाटील, दिलीप पाटील, राधेशाम चौधरी, प्रदीप पवार, सुलोचना वाघ, विद्याताई महाजन, हितेश पाटील, उदय पाटील, विजय महाजन, सुकलाल महाजन, भगतसिंग पाटील, शशिकांत पाटील, वैजनाथ रेणापूरकर, पराग पाटील, परेश पाटील, संजीव पाटील, राजेंद्र पाटील, रामदास लहासे, जगदिश गाढे, नादीर खान वशिम खान, अनिल पाटील, अर्जुन जाधव, अजबराव पाटील, नरेंद्र सपाटील, जाबीर बागवान, अलका शेरखान, भुषण पवार, अजय पाटील, रमेश शिंपी, शैलेंद्र पाटील, रतिलाल महाजन, किरण पाटील, विजय महाजन, वैजनाथ तुरकर, मुनबर खान, प्रभाकर सोनवणे, अहुमेक खलाणे, निळकंठ फालक, सय्यद मुश्ताक, अझरूद्दीन फारूकी, डॉ. जगदीश पाटील, आत्माराम जाधव, प्रा. संजय पाटील, ज्योत्न्सा विसपुते, योगेंद्र पाटील, अमृत पाटील, बी. बी. पाटील, संजीव बाविस्कर आदी उपस्थित होते.

’साले’ पदवी दानवेंना
खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी शेतकर्यांना दिलेली साले ही पदवी आम्ही शेत शेतकर्यांच्यावतीने विनम्रतापूर्वक सार परत करीत आहोत. त्याऐवजी त्यांना शेतकर्‍यांना कर्जमाफी, उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देणारा हमीभाव आणि शेतमालाच्या शासकीय खरेदीची तरतुद सरकारमार्फत करून द्यावी, अशी विनंती आम्ही आपल्या माध्यमातून करीत आहोत. साले ही पदवी धारण करण्याची आपली पात्रता नाही, अशी सर्व सामान्य शेतकर्याची भावना आहे. त्याऐवजी ही उपमा खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्यालाच अधिक शोभून दिसते. असेही बळीराजाचे मत असल्याचा घणाघात जळगाव जिल्हा कॉग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.