जळगावात दुचाकी चोरटे मुक्कामी : पुन्हा लांबवली दुचाकी

जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍याची दुचाकी चोरट्यानी लांबवली. दुचाकी चोरीचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या
गणेश प्रभाकर ईखे (32, चिंचोली, ता.जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या वाहनाचे चालक आहेत. गुरूवार, 27 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता गणेश ईखे यांनी दुचाकी (एम.एच.19 ए.झेड.1099) शासकीय महाविद्यालयाच्या गेट नंबर दोनमधील कर्मचार्‍यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधून दुचाकी लांबवली. रात्री आठ वाजता ही बाब लक्षात आली. पार्किग झोनमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत दुचाकी चोरून नेतांना चोरटा कैद झाला. जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जुबेर तडवी करीत आहे.