One lakh 20 thousand cash was extended from a closed house in Sriram Chowk जळगाव : बंद घरांवर चोरट्यांनी मोर्चा वळवला असून शहरातील श्रीराम चौकातील एका घराबून चोरट्यांनी एक लाख 20 हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील श्रीराम चौकातील निसर्ग कॉलनीतील रहिवासी दीपाली सतीश सोनवणे (33) या वास्तव्यास आहे. 7 ते 28 रोजीच्या दरम्यान अनोळखी चोरट्यांनी राहत्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड रक्कम मिळून एकूण एक लाख 20 हजार रुपयाचा ऐवज लांबवला. दीपाली सतीश सोनवणे यांनी शनीपेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास एएसआय किरण पाठक करीत आहेत.