जळगाव- शहरातील गणेश कॉलनी परिसरात चोरट्यांनी ऑफिसेस, दुकाने अशी चार दुकाने फोडली, तर याच परिसरातील पाच दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. शटर वाकवून, कुलूप तोडून काही दुकानांमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला मात्र कुठलीही रक्कम हाती लागली नाही. यात अॅड. ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांचे कार्यालय, त्याच्या शेजारीत मणिगुरु इन्व्हेसमेंट, कृती कन्ट्रक्शन व दर्ग्यासमोरील बडीज केक शॉप या दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी थेट प्रवेश केला. मात्र कुठलीही रक्कम हाती लागली नाही. विशेष म्हणजे एवढ्या दुकानांमध्ये प्रयत्न करुनही मेहनत वाया गेल्याने तसेच कुठलीही रक्कम हाती न लागल्याने चोरट्यांनी संतापाच्या भरात केक शॉपच्या गल्लयात स्वतःहून दहा रुपये ठेवले, व कुठलेही नुकसान न करता पोबारा केला. केक शॉपमध्ये केकसह कुठल्याही वस्तूला चोरट्यांनी हात लावला नाही. विशेष म्हणजे प्रयत्न झालेल्या एक ऑफिस हे हे पोलीस दलातील प्रसिध्द कर्मचार्याचे आहे.