भाजपातर्फे जळगावात आंदोलन: पाकिस्तान गळाभेटीचा केला निषेध
जळगाव- पाकीस्तानच्या लष्कर प्रमुखांची गळाभेट घेणार्या नवज्योत सिंग सिध्दूच्या फोटोला जोडा मारो आंदोलन गुरूवारी भाजपातर्फे जळगावात करण्यात आले. टॉवर चौकात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी सिध्दूच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. खासदार नवज्योतसिंग सिध्दू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टिका होत आहे.
जळगाव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे दुपारच्या सुमारास टॉवर चौकात सिध्दूच्या फोटोला जोडा मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, प्रदेश सरचिटणीस गितांजली ठाकरे, भुपेश कुळकर्णी, जितेंद्र चौथे, आनंद सपकाळे, जुगल लुल्ला, योगेश बागडे, उज्वल सोनवणे, राहुल सरोदे, विक्की सोनार, स्नेहा निंभोरे आदी उपस्थित होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिष रोही पथकासह लक्ष ठेवून होते. आंदोलनानंतर फोटो पोलिसांनी ताब्यात घेतला.