जळगाव– शहरातील कांचन नगर भागातील व्यवसायाने रीक्षा चालक असलेल्या बाबू कासम गवळी (वय 40) यांनी गळफास घेत मृत्यूला कवटाळले. शनिेवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसलेतरी त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.घरात कोणी नसताना गवळी यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा समीर तसेच मुलगी सीमरन आहे.