जळगाव: शहरातील खेडी परिसरात पतीने पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री पती समाधान रमेश साळवे याने पत्नी सोनी समाधान साळवे (३०) हिचा खून केला. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान सकाळी १० वाजता असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळावर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे दिसून आहे. ओळख पटल्यानंतर आत्महत्या केलेली व्यक्ती खून झालेल्या महिलेचा पती असल्याचे समोर आले. पती समाधान रमेश साळवे (३५)यांनी पत्नी सोनी साळवे हिचा कु-हाडीने वार करून खून केला आहे. खुनानंतर समाधान हा फरार झाला.
खेडीतील आंबेडकर नगरात दोघी वास्तव्यास होते. धारशिरी पाळधी (ह.मु. खेडी) हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले होते. पहाटे दोन वाजता समाधान साळवे याने घरातील लोखंडी कुन्हाडीने पत्नी सोनीच्या गळ्यावर वार करून खून केला. पती समाधान साळवेविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. समाधान साळवे याचे वडील रमेश साळवे हे देखील खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. मयत पती-पत्नीच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. खूनाची माहिती कळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.