जळगावात पुन्हा टोळी सक्रिय : पादचार्‍याचा धूम स्टाईल मोबाईल लांबवला

जळगाव : धूम स्टाईल मोबाईल लांबवणारी टोळी शहरात अ‍ॅक्टीव्ह झाली असून पादचारी विद्यार्थ्याच्या हातातून मोबाईल लांबवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. शहरातील गणेश कॉलनीतील खॉजामियाँ चौकाजवळ पायी जाणार्‍या विद्यार्थ्याच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी मोबाईल लांबवला. ही घटना सोमवार, 7 मार्च रोजी सायंकाळी घडली. या संदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धूम स्टाईल मोबाईल लांबवला
अनंत अनिल साळी (18, रा.वीर सावरकर नगर, पिंप्राळा) हा विद्यार्थी खॉजामियाँ चौकातील वाचनालयात सोमवार, 7 मार्च रोजी गेल्यानंतर घरी परतत असताना सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ख्वॉजामियॉ चौकात त्याच्यामागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी तरुणाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर रात्री 11 वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुळ गवारे करीत आहे.