Murder of youth in Jalgaon due to previous enmity : Accused in Bhurya in Trap जळगाव : जळगाव शहरातील जुने बस स्थानकाजवळ आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे (30, जळगाव) या तरुणाचा खून करण्यात आला होता. या खुनातील पसार आरोपी नरेंद्र उर्फ भुर्या उर्फ भद्रा पंडित सोनवणे (31, आसोदा, ता.जळगाव) यास आसोदा गावातून अटक करण्यात आली. दरम्यान, आकाशच्या खून प्रकरणी अन्य संशयीत गोपाल उर्फ अण्णा कैलास सैंदाणे (झोपडपट्टी, बालाजी मंदिरामागे, जळगाव) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
आसोद्यातून आवळल्या मुसक्या
आकाश सपकाळे या तरुणाचा खून केल्यानंतर संशयीत भुर्या हा पसार झाला होता मात्र तो हाती लागत नव्हता. संशयीत भुर्या हा आसोदा येथे आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना कळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील, सचिन महाजन आदींनी आरोपीच्या आसोद्यातून मुसक्या आवळल्या. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.