जळगावात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या !

0

जळगाव: शहरातील पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री साडेबारा जाजेच्या सुमारास घडली. भाग्यश्री प्रशांत पाटील (वय २६) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे नाव आहे. नेहरुनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

भारतीने आत्महत्या नव्हे तर पतीसह सासरच्यांनी तिचा घातपात केल्याचा आरोप भारतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. भारतीच्या कुटुंबीयांनी इनकॅमेरा आणि मॅजिस्ट्रेटसमोर शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील सध्या शनी पेठ पोलिस स्टेशनला गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत.पूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक यांचे अंगरक्षक होते.