जळगाव : शहरातील शिव कॉलनीतील प्रौढ व्यक्तीने सॅनिटायझर प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आहे. मंगलसिंग रामदास इंगळे (55) असे मयताचे नाव आहे.
रामानंद नगर पोलिसात नोंद
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवकॉलनीतील रहिवाशी मंगलसिंग रामदास इंगळे (55) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 16 एप्रिल रोजी दुपारी मंगलसिंग इंगळे यांनी घरात असलेले सॅनिटायझर घेतले. त्यांनी अत्यवस्थ वाटत असल्याने नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी शनिवार, 16 एप्रिल रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार निलेश पाटील करीत आहे.