जळगावात बंद घर फोडले : 30 हजारांची रोकड लंपास

जळगाव : बंद घरे चोरट्यांसाठी पर्वणी ठरत असून जळगाव शहरातील दौलत नगरातील बंद घरातून चोरट्यांनी 30 हजाराची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा
भास्कर शंकर पाटील (64, सुदर्शन अपार्टमेंट, दौलत नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून शुक्रवार, 1 एप्रिल रोजी ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत घराचे कुलूप तोडून कपाटातील 30 हजारांची रोकड लांबवली. ही बाब मंगळवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार दीपक शिरसाठ करीत आहे.