जळगावात बकरी ईदची जय्यत तयारी

0

जळगाव प्रतिनिधी । येथील मुस्लीम बांधवांतर्फे २२ ऑगस्ट रोजी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी करण्यात येणार असून यानिमित्त ईदगाह मैदानावर सामूहीक नमाज अदा करण्यात येणार आहे.

ईद-उल-अजहा निमित्त अजिंठा चौकाजवळील ईदगाह मैदानावर सकाळी ८.३० वाजता ईदची नमाज होणार असल्याचे रुहते हिलाल कमिटीने जाहीर केले आहे. जामा मशिदीत मौलाना उस्मान कासमी यांच्या अध्यक्षतेत रुहते हिलाल कमिटीची सभा झाली. त्यात शहरातील सर्व मशिदींचे इमाम व ट्रस्टचे अब्दुल करीम सालार, अमीन बादलीवाला, फारुख शेख, हबीब इंजिनिअर, सय्यद चाँद, मजीद जकेरिया सहभागी होते. या सभेत ईद शांततेने साजरी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व मुस्लीम बांधवांनी शांततेत बकरी ईद साजरी करावी, असे जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाखीर रजा रजवी व सुन्नी रुयते हिलाल कमिटीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.