जळगाव : शहरात अपघातांची मालिका कायम असून भरधाव ट्रालाच्या धडकेने पाळधीतील दुचाकीस्वारामागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला तात अपघातानंतर ट्रॉलीची कॅबीन तुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत कोसळली. हा अपघात सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठासमोर घडला. नाना नथ्थू माळी (40, रा.फुले नगर, पाळधी ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
ट्रालाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील फुले नगरात नाना माळी हे वास्तव्यास असून ते ट्रॅक्टवर चालक आहेत. काही कामानिनित्त नाना माळी हे एका सोबत त्यांच्या (एम.एच. 19 डी.क्यू.8749) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावात आले व काम आटोपून ते सोमवार, 20 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरी परतत असतांना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठा समोरुन जात असतांना एका दुचाकीचा नाना माळी यांच्या दुचाकीला कट लागला. यात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरुन येणार्या ट्राला (आर.जे.01 जी.बी.6465) समोर आली. दुचाकी अचानक समोर आल्याने ट्राला चालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकीच्या मागे बसलेले नाना माळी हे ट्रालाच्या चाकाखाली येवून चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परीवार आहे. दरम्यान, दुचाकीस्वाराबाबत अधिक माहिती कळू शकली नाही.
ट्राला चालक पोलिसांच्या ताब्यात
ट्राला चालक घनश्याम मगनलाल माळी (रा.कोचील, ता.किसनगड, जि. अजमेर, राजस्थान) हा ट्रालामध्ये घरासाठी लागणार्या स्टाईल घेवून गुजरातवरुन हैदराबाद येथे घेवून जात होता परंतु त्यांच्या ट्रालाखाली दुचाकीस्वाराचा चिरडला गेला. घटनास्थळी जमाव जमत असल्याने पोलिसांनी ट्राला चालकाला पोलिस ठाण्यात रवाना केले.