भुसावळ/धरणगाव : शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरट्यांनी लांबवली. धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू चोरी प्रकरणी झाली होती कारवाई
धरणगाव तहसीलच्या आवारात अवैधरीत्या गिरणा पात्रातून वाळू चोरी करणारा
ट्रॅक्टर (एम.एच.19 बी.जी.6071) व ट्रॉली जप्त करण्यात आल्यानंतर ती धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली होती मात्र चोरट्यांनी वाहन पळवल्याचा प्रकार उघड झाला आहे. तलाठी अलताब निझाम पठाण (33, अनिता नगर, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार योगेश जोशी करीत आहेत.