जळगावात मंदिरात चोरी : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Theft in Jagurt Mahadev Temple: Accused finally arrested जळगाव : जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन नगराती ल जागृत महादेव मंदीरात साहित्य लांबवल्याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश बबनराव केवारे (65, खामगाव, बुलढाणा, ह.मु.जळगाव) यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक किसनराव नजल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, अविनाश देवरे, हरीष परदेशी आदींनी रेल्वे स्टेशन मागील पुलाखालून आरोपीला अटक केली.