जळगाव : 52 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगलपोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईल लांबवली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
शीतल संजय रोकडे (52, ईश्वर कॉलनी, जळगाव) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास कामानिमित्ताने त्या घराबाहेर गेल्या होत्या व काम आटोपुन पुन्हा घराकडे परतत असतांना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी शीतल रोकडे यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीची मंगलपोत तोडुन नेली. काही कळण्याच्या आत दुचाकीस्वार पसार झाले. त्यानंतर रोकडे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री 10 वाजता तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.