जळगावात महिलेच्या घरावर दगडफेक ; दोन दुचाकींचे नुकसान

जळगाव : कारण नसताना मध्यरात्री दोघांनी शिविगाळ करीत घरावर दगडफेक करून दोन दुचाकींचे नुकसान केले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा
नलिनी विलास तायडे (50, गाडगे बाबा चौक, जळगाव) या आपल्या दोन सुना व मुलांसह वास्तव्यास अनू मुले व सुना हे नातेवाईकांच्या घरी लग्नासाठी बाहेरगावी गेले आहेत. बुधवार, 27 एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नलिनी तायडे या घरी एकट्या असतांना आबा आणि आश्विन (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह इतर दोन-तिघांनी घरासमोर येवून दगडफेक केली व घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकींची तोडफोड केली. नलिनी तायडे यांची दोन्ही मुले विनोद व सतीश यांना शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, पहाटे तीन वाजता रामानंद नगर पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर तक्रारीवरून संशयीत आरोपी आबा व आश्विन यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.