जळगाव- जळगावातील हॉटेल हॉटेल कोझी कॉटेज येथे भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक सुरु आहे.. या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाकडून उमेदवारीबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेतील नकारात्मकबाबींमुळेच विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही असे सांगितले.
या बैठकीला राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार चिमणराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांच्यासह युतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.