जळगावात रेल्वे गेटमनचे प्रसंगावधान ; जखमी प्रवाशाला रूळावरून हटवल्याने वाचला जीव

0

जळगाव- शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटवरील गेटमन सुहास पाटील यांनी प्रसंगावधान राखत रेल्वेतून पडलेल्या जखमी प्रवाशाला रेल्वे गाडी येण्यापूर्वीच रेल्वे रूळावरून बाजूला सारल्याने त्यांचे प्राण वाचल्याची घटना 7 रोजी सायंकाळी घडली. रविवारी सायंकाळी पुण्याकडे जाणारी 11038 अप रेल्वे गोरखपूरमधून जळगावातील रहिवासी फिरोज उर्फ कालू (50) हे पडल्याने गंभीर जखमी झाले. ही बाब पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरीफ यांना रेल्वे रूळावरून बाजूला करीत त्यांचे बंधू आरीफ शहा यांच्यासोबत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. सुहास पाटील यांच्यामुळे दुसर्‍या आठवड्याभरात प्रवाशाला जीवदान मिळाल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी देखील कौटुंबिक कलहातून एक महिला मृत्यूला कवटाळण्याच्या तयारीत असताना पाटील यांनी सतर्कता दाखवत या महिलेला बाजूला केल्याने तिचे प्राण वाचले होते हेदेखील विशेष !