जळगावात वर्सी महोत्सवास प्रारंभ

0

देशविदेशातून सिंधी समाजबांधव दाखल

जळगाव : अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे दि. 17 ते 21 ऑक्टोंबर दरम्यान वर्सी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 5 वाजता मंत्रोपचारात देवरी सहाब यांच्या पंचामृत स्नानाने वर्सी महित्सवाला सुरुवात झाली.त्यानंतर गुरुग्रंथ सहाब व धुनी साहाब यांच्या अखंड पाठ पठन करण्यात आले.संत कंवरराम नगरात सेवा मंडळ परिसरात पु. अमर शहीद संत कंवरराम साहेब यांचा 62 वा, पु. सद्गुरु संत बाबा हरदासराम साहेब यांचा 42 तर ब्रह्मस्वरुप बाबा गेलाराम साहेब यांचा 11 वा वर्सी महोत्सव संत साई राजेशकुमार, अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. महोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी असणार आहे. वर्सी महोत्सवासाठी देशविदेशातून सिंधी समाजबांधव जळगावात दाखल झाले आहेत.

गुरुवारी पहाटे 5 वाजता मंत्रोपचारात देवरी सहाब यांच्या पंचामृत स्नानाने वर्सी महित्सवाला सुरुवात झाल्यानंतर गुरुग्रंथ सहाब व धुनी साहाब यांच्या अखंड पाठ पठनाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजता शांती यज्ञामध्ये परिसरातीन दाम्पत्य सहभागी झाले होते. रात्री संत बाबा हरदास साहेब व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या जीवनावर क ार्यक्रम झाला. दि. 18 रोजी प.पु. संत बाबा हरदासराम सहाब यांचा महापरिनिर्वाण दिन, दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता झेंडा पूजन, गुरुग्रंथ सहाब व धुनि साहाब यांच्या अखंड पाठला भोग, दि. 20 रोजी वर्सी सहाब यांचा पल्लव व विश्वशांती यज्ञ होईल. यासह दि. 21 रोजी माता साहेव गंगादेवी (अमर शहीद संत कंवरराम सहाब यांच्या धर्म पत्नी) यांचा महानिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम होईल.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी
वर्सी महोत्सवादरम्यान दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधी नाटक, कॉमिडी नाटक, भजन संध्या, नृत्य, वादन, गायन अशा विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवाणी असणार आहे. स्थानिक कलावंतांसह देश-विदेशातील कलावंत सादरीकरण करणार आहेत.

देशविदेशातून आलेल्या भाविकांचे स्वागत
सिंधी समाजात संत कंवरराम नगराला धार्मिक स्थळाचा दर्जा असून वर्सी महोत्सवाला मोठे महत्त्व आहे. या महोत्सवात सहभागी होत अध्यात्माची अनुभूती घेण्यासाठी देश विदेशातील सिंधी भाविक जळगावात संत कंवरराम नगरात दाखल होत आहे. येणार्‍या भाविकांना रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर स्वागत करण्यात आले.

सिंधी कॉलनीत यात्रेचे स्वरुप
वर्सी महोत्सवासाठी सेवा मंडळ परिसरात भव्य असा सभा मंडप उभारण्यात आला आहे. याच सभामंडपात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ, प्रवेश द्वारासह शहरात वि विध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहे. याठिकाणी खेळण्यांची दुकाने, खाद्य पदार्थ व विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहे. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.