जळगावात विठ्ठल व रूख्मिणीचा मुकुट पळविला

0

जळगाव- जुने जळगावामधील पुरातन विठ्ठल मंदिरातील विठ्ठल व रूख्मिणी यांच्या डोक्यावर असलेला चांदीचा मुकुट व कुंडल अज्ञात चोरट्याने भरदिवसा पळवल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ मंदिरातील पुजारी समोरच्या महादेवाच्या मंदिरात पुजेसाठी गेले असता अवघ्या पाच मिनिटात चोरट्याने हा डल्ला मारला आहे़

जुने जळगावातील विठ्ठल-रूख्मिणी यांची मुर्ती असलेले पुरातन मंदिर आहे़ या ठिकाणी अनेक वर्षांपासून रथ चौकातील राजेंद्र जोशी हे मंदिरात पुजारी आहेत़ नेहमीप्रमाणे जोशी हे मंदिराम आरतीसाठी आले होते़ दुपारी १ वाजता मंदिरातील आरती आटोपल्यानंतर गाभाºयाच्या दरवाज्याला कडी लाऊन मंदिराबाहेर समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिरात पुजेसाठी गेले़ तेवढ्यात अज्ञात चोरट्याने भगवंत विठ्ठलाच्या मुर्तीवरील चांदीचे मुकुट तर रखुमाईच्या डोक्यावरील चांदीच्या मुकुटासह कुंडल चोरून नेले़ पाच मिनिटांनी जोशी पुजा आटोपून मंदिरात आल्यावर त्यांना गाभाºयाचा दरवाजा उघडा दिसला़ अन् मुर्तीवरील चांदीचे मुकुट व कुंडल चोरीला गेल्याचे दिसून आले़ त्यांनी त्वरीत शेजारी असलेले डॉ़ विश्वनाथ खडके यांना बोलवून मुकुट चोरीला गेल्याची माहिती दिली़ खडके यांनी त्वरीत शनिपेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली़