जळगाव । भारतात मोठ्या प्रमाणात चीन निर्मित उत्पादनाची विक्री होते. भारतीय उत्पादनांपेक्षा चीनच्या उत्पादनांना अधिक मागणी असल्याने चीनला मोठा भांडवलाचे उत्पन्न होते. या भांडवलातुन चीन पाकिस्तानला आर्थिक मदत करत असून भारताविरोधात कुरघोडी करण्यासाठी प्रोत्साहित करत दिसून येते. दरम्यान डोकलाममध्ये भारतीय सैन्याने तळ ठोकल्याने चीनने भारताविरूद्ध युद्ध पुकारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ जळगावात चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चायना मोबाईलची विक्री थाबविण्यात आले आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जनजागृतीपर पत्रके वाटप सुरु केले आहे. तर सोमवारी गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनने चायना कंपनीचे मोबाईल व वस्तूंची विक्री न करण्याचा संकल्प केला आहे. चीनकडून भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण झालेला आहे. एकीकडे पाकिस्तानशी सैनिकी युती करून चीन भारताला संपवू पाहात आहे.
चिनी वस्तुवर बहिष्काराचा प्रचार
दुसरीकडे जागतिक खुल्या आर्थिक धोरणाचा गैरफायदा घेऊन आपल्या स्वस्त व तकलादू वस्तू भारतीय बाजारात विक्री करीत भारतीय र्थव्यवस्था खिळखिळी करू पाहात आहे. भारतातून कमावलेल्या पैशांवर भारतासोबतच युद्धाची भाषा करण्याचे चीनचे धोरण हाणून पाडण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार मोहिम सुरू करण्याबाबत जळगावातील विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सुरु केली आहे.
पत्रकाचे वाटप
जळगावात व्यापार्यांचा मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प सोमवारी विवेकानंद मंडळातर्फे गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनच्या पदाधिका:यांसोबत चर्चा करून चायना कंपनीचे मोबाईल व वस्तूंची विक्री न करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. व्यापार्यांनी देखील चायना कंपनीची मालकी असलेल्या मोबाईल कंपनीचे फलक उतरविले आहेत. तसेच चायना कंपनीचे मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प केला आहे. चायना वस्तूंवरील बहिष्कारासाठी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळातर्फे जनजागृतीपर पत्रक वाटप करण्यात येत आहेत.
भारतीय उद्योंगाना होतोय तोटा
या संदर्भात मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता गोलाणी मार्केटमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. मसूद अजहरला दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात चीनने खोडा घातला. भारताच्या सीमेतून महामागार्ची निर्मिती सुरू केली. अरुणाचल प्रदेशावर चीनचा दावा कायम आहे. सिमेवर नियमितपणे चिनी सैनिक भारतीय सैनिकांसोबत उर्मट वर्तन करत असतात. दुसरीकडे चिनी वस्तूंचे मार्केट भारतात इतके वाढलेले आहे, की त्याचा फटका अनेक भारतीय उद्योगांना
बसलेला आहे.