जळगाव । तांबापूरमधील बिलाल चौक परिसरातील 50 वर्षीय महिलेचा शॉक लागून मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जागीच मृत्यू झाला.
जिन्नताबी हुसेन शेख ( वय 50) या मंगळवारी दुपारी कपडे सुकवण्यासाठी अंगणात आल्या होत्या. विजेची तार अंगणातील खड्ड्यात पडली होती. त्यांच्या पाय खड्ड्यातील पाण्यात पडल्याने त्यांना शॉक लागला. यात महिला जागीच ठार झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी महिलेचा मृत्यू झालेला असल्याचे जाहीर केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.