जळगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली. आंतरजिल्हा प्रवेश देखील बंद करण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांना नाही याचेच दर्शन जळगावात दिसून आले. राज्यात संचारबंदी लागू असताना जळगावात मात्र सर्वत्र मुक्त साचार दिसून आला. नागरिक नेहमी प्रमाणे मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसून आले. शनिपेठ परिसर, गणेश कॉलनी, सुभाष चौक, कोर्ट चौकात मोठी गर्दी दिसून आली.
संचारबंदीचा निर्णय हा आपल्यासाठीच घेण्यात आला आहे ही भावना नागरिकांमध्ये नाही ही खेदजनक बाब आहे. पोलिसांनी अक्षरश: हात जोडून रस्त्यावर फिरणाऱ्यांना घरीच राहण्याची विनंती केली. शेवटी नाईलाजाने पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद देखील दिला.