जळगावात स्टेट बँकेचे एटीएम फोडणार्‍या तरुणाला शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले

0

जळगाव- खेडीच्या तरुणाने चक्क एटीएम फोडून कर्जफेड करण्याची शक्कल लढविली. त्यानुसार चित्रपटातील कथाकनाप्रमाणे तोंडाला मास्क, डोक्याला रुमाल बांधून तसेच एटीएम फोडण्यासाठी आवश्यक असे सर्व साहित्य घेवून नाथा प्लाझामधील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅकेची अत्याधुनिक यंत्रणा व गस्तीवर असलेल्या सतर्क शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी रविवारी मध्यरात्री 1.45 वाजेच्या सुमारास तरुणाचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. एटीएम फोडणार्‍या विजय बन्सी अहिरे वय 30 रा. खेडी बुद्रूक या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या बॅगेत दारुच्या दोन बाटल्याही मिळून आल्या आहेत.