भुसावळ । जळगाव रेल्वे स्थानकावर एका संशयीताच्या ताब्यातून लोहमार्ग पोलिसांनी 11 हजार रूपये किंमतीची बेकायदा देशी दारू जप्त केली आहे. आरोपीस अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. शनिवारी सकाळी लोहमार्गचे एएसआय अहिरे, योगेश अडकणे, अनेंद्र नगराळे हे गस्त घालीत असतांना प्लॅटफार्म क्रमांक तीनवर एक संशयीत पोलिसांना पाहताच पळू लागल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या बॅगेत 11 हजार 674 रुपये किंमतीच्या 449 देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. आरोपीविरूध्द नगराळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.