जळगाव- पावसाळ्यात साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पाणी साठवणूकीमुळे डास,अड्या निर्माण होवून डेंग्यूसदृष्य आजार लागण होण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शहरात तपासणी मोहीम सुरु केली आहे. 3178 घरांची तपासणी केली असता 172 ठिकाणी डेंग्यूसदृश्य अळ्या आढळून आल्या आहेत.दरम्यान, अॅबेटींग करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली.
मनपा आरोग्य विभागाच्या 56 कर्मचार्यांच्या माध्यमातून तपासणी मोहिम आणि सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक घरांमधील पाणी साठवलेल्या भांड्याची,पाण्याच्या टाक ीची तपासणी मोहिम सुरु केली आहे. डेंग्यूसदृश्य अळ्या दिसल्यास त्याठिकाणी अॅबेटींग,धुरळणी,फवारणी करण्यात येत आहे. मनपाच्या 56 कर्मचार्यांच्या माध्यमातून 318 घरांतील 11 हजार 184 भांडी तपासण्यात आली.त्यापैकी 172 ठिकाणी अळ्या आढळून आल्या आहेत. तसेच 1586 ठिकाणी अॅबेटींग करण्यात आली आहे.
कोरडा दिवस पाळावा
पावसाळ्या दिवसात साठवलेल्या पाण्यात अळ्या तयार होत असतात. परिणामी डासांची उत्पती वाढून डेंग्यूसदृश्य आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मनपाच्या 56 कर्मचार्यांचे पथक
शहरातील प्रत्येक घरोघरी जावून पाणी साठविलेली भांडी तपासणी करण्यासाठी मनपाच्या 56 कर्मचार्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. पथकांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.तसेच अॅबेटींग,धुरळणी,फवारणी आणि जनजागृती करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.