भुसावळ- जनसेवा सामाजिक विकास संस्था संचलित व समस्त राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा संघार्फे रजपूत समाजातील, शासकीय, प्रशासकीय सेवेत यश संपादन केलेल्या तसेच निवृत्त झालेल्यांचा सन्मान, माजी सैनिक, विविध पदवी प्राप्त, पुरस्कार प्राप्त, लोकसेवक तसेच उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान सोहळा रविवार, 20 रोजी सकाळी 10.30 वाजता जळगाव शहरातील पांडे डेअरम चौकातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात होणार आहे. अध्यक्षस्थानी धुळे उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार बी. पाटील असतील. उद्घाटन आमदार किशोर पाटील (पाचोरा) यांच्या हस्ते होईल. प्रमुख विभागीय अधिकारी सुरेश उमाप हे ‘उद्योग कसा करावा’ या विषयी मार्गदर्शन करतील.
यांची राहणार प्रमुख उपस्थिती
आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), जळगाव शहर जळगाव महापौर सीमा भोळे, नारायण काळू पाटील, जनार्दन नारायण पवार, युवराज हिरामण पाटील, पी.बी.चौधरी, एफ.एन.महाजन, एस.आर.पाटील, मधुकर भास्कर मोरे, बाळकृष्ण शंकर पाटील, वामन चिमण पाटील, अरुण देविदास महाजन, प्रभाकर जुलाल महाजन, नामदेव गंगाधर सोनवणे, रमेश पंडित पाटील, अनिल आत्मराम महाजन, सतीश हरीरश्चंद्र पाटील, कैलास भीमराव मोरे आदींची उपस्थिती राहणार आहे. समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन राजपूत समाजाचे अध्यक्ष किशोर वसंत महाजन, जनसेवा सामाजिक विकास संस्था व समस्त राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा संघ पदाधिकार्यांनी केले आहे.