17 झोनमधील 400 खेळाडूंचा सहभाग ः उत्कृष्ट प्रदर्शन करणार्यांची ऑल इंडिया पोलिस डु्यटी अॅथलेटीक्स मीटसाठी होणार निवड
भुसावळ- भुसावळ विभागीय रेल्वे सुरक्षा विभागातर्फे मंडळ सुरक्षा आयुक्त अजयप्रकाश दुबे यांच्या नेतृत्वात 29 ते 31 दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या अॅथलेटीक्स स्पर्धा जळगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर होत आहेत. या स्पर्धेत 17 झोनमधील तब्बल 400 खेळाडू सहभागी होत असून उत्कृष्ट प्रदर्शन करणार्यांची ऑल इंडिया पोलिस डु्यटी अॅथलेटीक्स मीट स्पर्धेसाठी निवड होणार आहे. देशभरातून भुसावळ विभागाला यंदा स्पर्धा आयोजनाचा सन्मान प्राप्त झाला आहे. ऑल इंडीया आरपीएफ अॅथलेटीक चॅम्पीयनशीप 2018 चे आयोजक अजयप्रकाश दुबे, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित, सहाय्यक सुरक्षा आयुक्त सुरेश चंद्र आदी स्पर्धेसाठी झटत आहेत. 31 रोजी स्पर्धेचा समारोप होार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर करणार्या खेळाडूंची ऑल इंडिया पोलिस डु्यटी अॅथलेटीक्स मीटसाठी निवड होणार आहे. या स्पर्धेसाठी विभागीय सुरक्षा आयुक्त कार्यालयातील शंकर एडले यांनी खास लोगो बनवला आहे.