जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदाराची पोलिस कोठडीत रवानगी

0

वॉरंटमधील संशयीतांना जामिनासाठी पाच हजार लाचेची केली होती मागणी

जळगाव- वारंटातून जामिनावर सोडण्यासाठी पाच हजारांची लाचेची मागणी करणार्‍या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी अटक केली होती. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची म्हणजे 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तक्रारदार यांच्या वडील व काकांविरुद्ध जुन्या गुन्ह्याचे वॉरंट असल्याने त्यात संशयीत आरोपी तथा हवालदार दयाराम देवराम महाजन (47, पोलिस हौसिंग सोसायटी, शाहुनगर, जळगाव) याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी 17 ऑक्टोबर रोजी केली होती. एसीबीच्या चौकशीत आरोपीने केलेली डिमांड निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी रात्री आरोपी महाजन जिल्हा रुग्णालयाच्या चौैकीवर कर्तव्यावर असतानाच त्यास अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नीलेश लोधी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन
लाचेची मागणी करणार्‍यांविरुद्ध नागरीकांनी निसंकोचपणे जळगाव एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी केले आहे.