जळगाव एसीबीच्या नूतन पोलिस उपअधीक्षकपदी सतीश भामरे

पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

जळगाव : जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ महादू ठाकूर यांचा 31 मे रोजी सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना 1 जून रोजी सहकार्‍यांतर्फे निरोप देण्यात आला तर नूतन उपअधीक्षकपदी आलेल्या सतीश भामरे यांचे निरीक्षक निलेश लोधी, निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, उपअधीक्षक सतीश भामरे यांनी यापूर्वी जळगाव जिल्हा पोलीस दलात कर्तव्य बजावल्याने त्याचा फायदा निश्‍चितच जनतेला होणार आहे.

तक्रार असल्यास साधावा संपर्क
सरकारी काम करताना कुणी अधिकारी, कर्मचारी लाच मागत असल्यास वा लाचेसंबंधी काही तक्रार असल्यास पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांच्याशी मोबाईल (8888834097) तसेच जळगाव कार्यालयाशी 0257-2235477 व टोल फ्री क्रं.1064 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.