जळगाव कृउबा सभापतीपदी लकी टेलर

0

जळगाव । कृउबा सभापती व माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे प्रकाश नारखेडे रांच्रा विरोधात 3 नोव्हेंबर रोजी 14 विरुध्द 2 अशा फरकाने अविश्‍वास ठराव पारित करण्यात आलेला होता. नारखेडे यांच्यावर अविश्‍वास ठराव बहुमताने पारित झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान मंगळवारी 21 रोजी सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिवसेनेचे लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांना 17 पैकी 14 सभासदांनी मतदान केल्याने त्यांची निवड घोषीत करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शिवाजी बाराहाते यांच्या उपस्थितीत निवड घोषीत करण्यात आली. उपसभापतीपदी मनोहर पाटील यांची निवड करण्यात येणार आहे.